बारामती: प्रतिनिधी
शहरातील वाहतूक अधिक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी बारामतीतील प्रमुख 10 ठिकाणीसिग्नल यंत्रणा बसवाव्यात, तसेच अतिक्रमण काढून रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत, असे स्पष्ट निर्देशउपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पवार यांनी बारामती शहरातील तीन हत्ती चौक, ध्वजस्तंभ परिसर, गुणवडी चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्सतसेच जलसंपदा विभागाच्या निवासी इमारतींसह विविध विकासकामांची पाहणी केली. त्यांनी संबंधितविभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेतली व आवश्यक सूचना दिल्या.
प्रमुख घोषणा व सूचना:
1) तीन हत्ती चौकात सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर बसवाव्यात.
2) नटराज नाट्य कला मंडळाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या 30 मीटर उंच ध्वजस्तंभाचे काम वेगानेपूर्ण करावे.
3) हुतात्मा स्तंभासाठी नगर परिषद कार्यालयाशेजारील जागेचा वापर करावा. यामध्ये स्वातंत्र्यलढ्यातीलमहत्त्वाच्या घटनांचा समावेश करावा.
4) गुणवडी चौकातील व्यापारी संकुलाचे सौंदर्यीकरण, फरश्या, रंगकाम, रस्त्यांचे काम लवकर पूर्णकरण्याच्या सूचना.
5) जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्व सुविधा असलेले आधुनिक निवासस्थान उभारण्याचेआदेश.
6) नगर परिषद इमारतींवर स्पष्ट नामफलक लावावेत
7) सेंट्रल पार्क समोरील जागेत महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी सुधारित आराखडा सादर करण्याचेनिर्देश.
8) बसस्थानक परिसर स्वच्छता मोहीम राबवावी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी.
दर्जेदार कामांवर भर:
पवार यांनी स्पष्ट केलं की, तालुक्यात सुरू असलेली सर्व विकासकामे दर्जेदार, टिकाऊ आणि वेगानेपूर्ण व्हावीत. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असेनिर्देश त्यांनी दिले. नागरिकांनाही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, डॉ. सुदर्शनराठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी), अमोल पवार (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम), दिगंबर डुबल (कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग), तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी पंकजभुसे, सचिन सातव (अध्यक्ष, बारामती सहकारी बँक), माजी नगरसेवक किरण गुजर आदी मान्यवरउपस्थित होते.
0 Comments